|
रौप्य महोत्सवी
वर्ष उत्घाटन समारोह
दि. २४/०७/२००७
बांभोरी
अभियांत्रिकी महाविद्यालयात
दि. २४ जुलै २००७ रोजी रौप्य
महोत्सवी वर्ष उत्घाटन समारोह
उत्साहात साजरा. दि. २४ जुलै
१९८३ रोजी अभियांत्रिकी महाविद्यालय
सुरु झाले. आज या महाविद्यालयास
२४ वर्ष पुर्ण होत असुन २५ व्या
वर्षात पदार्पण करीत आहेत. दि.
२४ जुलै पासुन म्हणजे आज पावेतो
रोप्य महोत्सवी वर्ष सादर होणार
आहे.
उत्घाटन समारोह प्रसंगी
कार्यक्रम अध्यक्ष श्री. व्हि.
आर. फदणीस यांचे हस्ते दिप प्रज्वलन
झाले. त्यानंतर साक्षी गुप्ता
व नेहा गीते यांनी सरस्वती वंदना
सादर केले. आज हे महाविद्यालय
शिक्षणरुपी वटवृक्ष झाला आहे.
त्यासाठी व्यवस्थापन समितीचे
सदस्य ज्यांनी आपले महान व अनमोल
योगदान दिले आहे व आमच्यात नाही
आहेत असे सदस्य कै. वाय. एस. महाजन,
कै. ए. ए. काजी, कै. मिठाराम मुलचंद
वरयानी यांना श्रध्दांजली दिली
गेली. त्यानंतर उपस्थित मान्यवर
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.
व्हि. आर. फडणीस, प्राचार्य डॉ.
राकेश मोवार, डॉ. आर. एच. गुप्ता,
प्रा. जी. पी. चट्टोपाध्याय व
श्री व्ही . डी. जोशी माजी प्राचार्य
अभियांत्रिकी महाविद्यालय,
बांभोरी यांना पुष्पगुच्छ देवुन
स्वागत करण्यात आले.
महाविद्यालयासाठी आपले
२५ वर्षाचे योगदान दिलेल्या
कर्मचाऱ्यांमध्ये श्री. बी.
एल. अहिरराव, श्री. वाय. ए. पाटील,
श्री. व्ही. बी. जावळे, श्री. एल.
एम. भोरटक्के, श्री. विक्रम पाटील,
श्री. आर. एम. नेहेते यांना पुष्पगुच्छ
देवुन सत्कार करण्यात आला. यांनी
आपआपले मनोगत व्यक्त केले, त्यात
त्यानी म्हटले की, भविष्यात
हे महाविद्यालय प्रगती पथावर
अग्रेसर राहिल अशी इच्छा केली.
त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य
डॉ. राकेश मोवार यांनी कार्यक्रमाचे
अध्यक्ष श्री. व्ही. आर. फडणीस
साहेब यांचा सत्कार केला कारण
ते देखिल २५ वर्षापासुन या संस्थेचे
संचालक आहेत व ते योग्य ते मार्गदर्शन
या महाविद्यालयास देत आहेत.
प्राचार्य डॉ. राकेश मोबार
यांनी महाविद्यालयाचा प्रोग्रेस
रिपोर्ट प्रस्तुत केले. त्यात
त्यांनी सांगितले की, २० जुन
१९८३ रोजी महाविद्यालयास परवानगी
मिळाली व २४ जुलै १९८३ रोजी महाविद्यालयाचे
उत्घाटन झाले. महाविद्यालयाची
स्थापना मा. सौ. प्रतिभाताई पाटील
व डॉ. डी. आर. शेखावत यांचे हस्ते
झाली. सुरुवातीला महाविद्यालयात
सिव्हील, ई अण्ड टीसी व प्रॉडक्शन
या तीन शाखा होत्या. आता या महाविद्यालयात
आठ शाखा व दोन एम. ई. चे कार्सेस
आहेत. सुरुवातीला महाविद्यालयाचे
प्राचार्य श्री. एम. जी. पाटील
हे होते. सुरुवातीला फक्त ९ शिक्षक
, १३ शिक्षककेतर कर्मचारी व १८०
विद्यार्थी होते. तर आता ८५ शिक्षक,
१३५ शिक्षकेतर कर्मचारी व १,५००
विद्यार्थी आहेत.
सन १९८३ मध्ये कॉलेजची
लागत ५० लाख होती. आता २००७ मध्ये
५६५ लाख आहे. महाविद्यालयाची
२५ एकर जमिन आहे. स्वत:ची भव्य
व सुंदर इमारत आहे. सुरुवातीला
महाविद्यालयाचे ग्रंथालय ७६५
पुस्तकांवर सुरु झाली होती.
आता ३७,२०० पुस्तके आहेत, ज्यांची
किंमत १ कोटी आहे. आता महाविद्यालय
'ए' ग्रेड व ऑक्रिडिटेड महाविद्यालय
आहे. ज्याला आपण एक आदर्श महाविद्यालय
म्हणु शकतात.
महाविद्यालयाने जे व्हीजन
पाहिलेले आहे ते भविष्यात पुर्ण
करतील, त्यात १०० टक्के निकाल,
१०० टक्के प्लेसमेंट, प्रयोगशाळेचा
बदलत्या तंत्रज्ञानाशी समरस
करणे, महाविद्यालयाची डीम युनिर्व्हसिटी
बनविणे यादी. डॉ. आर. एच. गुप्ता,
श्री. जी. पी. चट्टोपाध्याय यांनी
आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम
अध्यक्ष श्री. व्ही. आर. फडणीस
आपले भाषणात म्हणाले रविवार
दि. २४ जुलै १९८३ साली सकाळी
१० वाजता एम. जे. कॉलेजच्या सभागृहात
उत्घाटन समारोह साजरा झाला.
उत्घाटक शिक्षण मंत्री सुधाकरराव
नाईक हे होते. प्रमुख पाहुणे
केंद्रीय मंत्री श्री विजय
नवल पाटील व अध्यक्ष श्री. वाय.
एस. महाजन होते. श्री. ए. ए. काजी
यांनी बांभोरी येथील जागा दाखवली.
ती जागा सर्वाना पसंद पडली व
ती जागा अतिशय खडकाळ होती. बांभोरी
गांवांत गिरणा नदीच्या काठावर
आज आलीशान अशी भव्य इमारत बांधुन
महाविद्यालय सुरु करण्यात आले.
व्यवस्थापन, शिक्षक व शिक्षकेतर
कर्मचारी यांनी सुरुवातीपासुन
निस्वार्थीपणे व चांगल्या पध्दतीने
काम केल्यामुळे आज महाविद्यालय
प्रगतीवर पोहचले आहे.
त्यांनी रौप्य महोत्सव
निमित्त सर्वांना हार्दीक सुभेच्छा
दिली आणि अशी आशा व्यक्त केली
की, रौप्य महोत्सव समारोप प्रसंगी
भारताचे राष्ट्रपती व महाविद्यालयाची
संस्थापिका मा सौ प्रतिभाताई
पाटील उपस्थित राहतील.
या कार्यक्रमाचे यशस्वी
करीता महाविद्यालयाचे सांस्कृतिक
समिती यांनी अथक परिश्रम घेतले.
प्रा. क्रृष्णा
श्रीवास्तव
पी. आर.
ओ.
|